लोटे : – घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, लवेल येथे दि. १० ते १२ ऑगस्ट दरम्यान मुंबई विद्यापीठ कोकण झोन-४ आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा मुलांच्या व मुलींच्या गटात उत्साहात आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रा. संदीप मुनघाटे, मुंबई कोकण झोन कमिटीचे सचिव स्पोर्ट्स डायरेक्टर शशांक उपशेटे, घरडा कॉलेज जिमखाना चेअरमन प्रा. सचिन ढवले, स्पोर्ट्स टीचर संजय बोले तसेच महाविद्यालयाच्या स्पोर्ट्स कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
या स्पर्धेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला. मुलांच्या गटात एकूण ८ संघ, तर मुलींच्या गटात ६ संघांनी सहभाग नोंदविला.
मुलांच्या गटात गोगटे कॉलेज, रत्नागिरी संघाने प्रथम क्रमांक पटकावला. घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, लवेल संघाने द्वितीय, तर लांजा कॉलेज संघाने तृतीय क्रमांक मिळविला.
मुलींच्या गटात डी.बी.जे. कॉलेज, चिपळूण संघाने प्रथम क्रमांक पटकावला. वेळणेश्वर कॉलेज संघाने द्वितीय, तर गोगटे कॉलेज, रत्नागिरी संघाने तृतीय क्रमांक मिळविला. घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, लवेल संघाने चौथा क्रमांक मिळविला.
स्पर्धेतील सर्व विजयी संघांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाने स्पर्धेचे उत्तम नियोजन व आयोजन केले.
खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेत रंगत आणली. उत्साहपूर्ण आणि क्रीडामय वातावरणात ही विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाली.
जी. आय. टी.एम. लवेल येथे मुंबई विद्यापीठ कोकण झोन-४ आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा संपन्न…
