लांजा : पुर्णगड येथिल श्री देव महापुरुष देवस्थान, डोर्लेकर उर्फ वाघे, डायबा, डावखुरे, वासावे, आंबेरकर परिवार भावकी बंधू मंडळ पूर्णगड खारवीवाडा आयोजित श्री सत्यनारायण महापूजा निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते
सकाळी महापुरुष पूजा आरती व श्री सत्यनारायण महापूजा या महापूजेच्या साहित्याचा खर्च श्री परेश डोर्लेकर यांनी केला होता तसेच शालेय विद्यार्थी वर्गाच्या टॅलेंट ला वाव मिळावा म्हणून शालेय समूह गायन स्पर्धा उदंड प्रतिसादात संपन्न झाली
मंडळाकडून रोख रक्कम व कै रुक्मिणी भिकाजी डोर्लेकर स्मरणार्थ कु स्वीटी विलास नाटेकर यांजकडून चषके व सर्व सहभाग विद्यार्थाना सौ सायली केशव कुलवडे भाडूप यांजकडून शालेय भेट वस्तू अशी बक्षिसे मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आली तसेच कै रुक्मिणी डोर्लेकर व श्री तुकाराम गोपाळ डोर्लेकर स्मरणार्थ श्री गणेश अनत डोर्लेकर यांनी दिलेल्या महाप्रसादचा आस्वाद सर्वांनीच घेतला
सायंकाळी मा सौ वर्षा ढेकणे (भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष) व मा सौ विणा बळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरूवात श्री सदिप आंबेरकर यांनी संगीतबध्द केलेले सुमधूर ईशस्तवन स्वागतगीताने झाली
पूर्णगड गावातील पहिली मुस्लिम सुकन्या मा अरमाना सिराज मुजावर या MPSCपरिक्षेत उत्तीर्ण होवून गावाचे व समाजाचे नाव उज्वल केल्याबद्दल त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी हा माझा सत्कार नसून माझ्या आईवडिलांचा आहे शैक्षणिक दृष्टीने माझ्याकडे असणारे ज्ञान कधीही आपल्या गावासाठी द्यायला तयार आहे व मी या सत्काराबद्दल या मंळाची कायम ऋणी राहिन असे भावनिक उदगार मा अरमाना मुजावर यांनी काढले या वेळी कै रुक्मिणी डोर्लेकर स्मरणार्थ समाजातील विधवा महिलांचाही सन्मान करण्यात आला
उदंड प्रतिसादात होणारा हा भावकी बंधू पूर्णगड आयोजित कार्यक्रम सर्वानाच प्रेरणा देणारा— सौ वर्षाताई ढेकणे..
