गुहागर : गुहागर शहरातीलसहदुय्यम निबंधक कार्यालय नियमित सुरु करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
गुहागर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय हे कारोना काळानंतर आजतागतय दर आठवडयाचे गुरुवारी व शुक्रवारी असे दोन दिवस सुरु आहे. त्यामुळे खरेदीखत, बक्षिसपत्र, मुखत्यारपत्र, बँकेचा बोजा चढवणे, गहाणखत असे दस्त नोंदणीचे या कामांना विलंब होत असतो. तसेच आठवड्यातील दोनच दिवस काम चालत असल्यामुळे या दिवशी गर्दी असते.

तसेच नेट व लाईट यांचा लपंडाव यामुळे तालुक्यातील जनता तसेच बाहेरुन येणारे खरेदीदार यांना सर्व प्रकारे त्रास होत आहे. गुहागर हे पर्यटन स्थळ असुन सदर तालुक्यातील हे महत्वाचे कार्यालय असुन मुल्याकंन मिळणे, नक्कल मिळणे, सर्च करिता पावती मिळणे तसेच अन्य काही आवश्यक सेवा या कार्यालयातुन कार्यालय दोनच दिवस सुरु असल्यामुळे विलंबान मिळत असल्यामुळे गुहागर तालुक्यातील जनतेला नाहक त्रास होत आहे. त्यामुळे
दस्तनोंदणीसुध्दा कमी प्रमाणात होत आहे. हे कार्यालय हे नियमित चालु झाल्यास दस्त नोंदणीसंख्या वाढू शकते तसेच कार्यालयातील इतर सेवा त्वरित जनतेला मिळू शकतील यामुळे वरिष्ठांनी दखल घेऊन घेऊन हे कार्यालय आठवडाभर चालू राहावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.