चिपळूण : येथील वीरशैव लिंगायत समाजाची रामतीर्थ तलावापरिसरातील स्मशानभूमीची पोकळीस्त बिननंबरी जागेची नव्याने मिळकत पत्रिका तयार करुन सदर सुमारे 34 गुंठा जागेस महाराष्ट्र शासनाचे नांवे करणे बाबत मा. जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, रत्नागिरी यांनी तालुका भूमि अभिलेख चिपळूण यांना आदेश पारित केले आहेत. त्यानुसार तालुका भूमि अभिलेख कार्यालयाकडून कार्यवाही सुरु झाली आहे.
सदर स्मशानभूमीचे सभोवार रिटेनिंग वाॅल, स्मशान शेड,नळकनेक्शन इत्यादी सुविधा पुरविणे बाबत संजय जाधव मुख्याधिकारी नगर परिषद चिपळूण यांना रत्नागिरी माहेश्वर मंडळाचे माजी अध्यक्ष श्री विवेक जंगम, लिंगायत समाजाचे माजी अध्यक्ष अरविंद वरवडेकर, श्रीमती अश्विनी वरवडेकर, नितीन आलेकर,दिपक आलेकर इत्यादी माहेश्वर व लिंगायत समाजाचे प्रतिनिधीनी चिपळूण शहरी भागातील सुमारे शंभर बांधवाचे स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले आहे. याबाबत मुख्याधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच यावर कार्यवाही करून पुढील प्रक्रिया करण्याचे आश्वासन दिले आहे. याबद्दल लिंगायत समाजाच्या सर्व समाज बांधवांनी आभार व्यक्त केले आहेत.
