खेड :- तालुक्यातील साखरोली गावातील भुवड वाडीतील 61 वर्षीय संतोष रामजी साटले यांनी दारुच्या नशेत घराच्या लाकडी भालाला नाॅयलाॅन जाज दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी मृत संतोष रामजी सुटले यास कळबणी बुद्रुक येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी करून मृत घोषित केले. याबाबत येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यु रजिस्टर नंबर 79/2026 मध्ये बीएनएसएस 194 नुसार नोंद करून घेत अधिक तपास पोलीस करीत आहेत. ही घटना शुक्रवार दि. 18 सष्टेबर 2026 रोजी पहाटे 03.00 ते 4.00 वाजण्याच्या सुमारास घडली. या आकस्मिक मृत्यु प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
About The Author
Related Posts
Recent Posts
- वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!
- दापोली नगरपंचायतीसमोर प्रसाद कर्वेंचे उपोषण सुरू; नगराध्यक्षा कृपाताई घाग यांनी मांडली भूमिका..
- आंदोलनजीवी ‘सीजेपी’चे आंदोलन म्हणजे अराजकतेचे व्याकरण; सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची खरमरीत टीका
- खंडाळा घाटात पुण्यातील व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; रेल्वे ट्रॅकजवळ आढळला मृतदेह…
- खोपोलीत भाजपच्या वतीने स्मशानभूमीत स्वच्छता अभियान…