खेड :- तालुक्यातील चाकाळे गावातील हनुमाननगर भागात राहणारे फिर्यादीत राजेश सखाराम कदम वय 45 हे ललिता घाणेकर हे भाड्याने चाकाळे हनुमाननगर येथे भाड्याने राहत असलेल्या घरासमोर बसले होते, मागील कुठल्यातरी भांडणाचा राग मनात धरून संशयीत आरोपीत 1) दिपक पांडुरंग भिलारे, 2) पुष्पा पांडुरंग भिलारे , 3) संशयीत आरोपीत क्रमांक 1 दिपक पांडुरंग भिलारे यांचा मुलगा याचे संपुर्ण नांव माहीत नाही. संशयीत आरोपीत दिपक पांडुरंग भिलारे याने आपल्या हातुन आणलेल्या बांबूच्या काठीने फिर्यादीत यांना शिविगाळ करीत, फिर्यादीत यांच्या डोक्यात, दोन्ही हातावर, पाठीवर मारुन दुखापत केली म्हणून येथील पोलीस ठाण्यात संशयीत आरोपीत याचेवर गुन्हा रजिस्टर नबर 314/2016 मध्ये येथील पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे अधिनियम कलम 118(2), 1115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) प्रमाणे येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्याची फिर्याद राजेश सखाराम कदम यांनी वर नमुद संशयीत आरोपीत यांचे विरोधात फिर्याद दाखल केली असून, हा गुन्हा शुक्रवार दिनांक 18 सष्टेबर 2026 रोजी दुपारी 13.00 वाजताच्या सुमारास घडला असुन, या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.