खेड : शहरातील महाडनाका येथे उभारण्यात येत असलेल्या माजी आमदार स्व. तु. बा. कदम व्यापारी संकुलाच्या बांधकामाची खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ. माधवी राजेश बुटाला यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.
यावेळी नगराध्यक्षांसोबत बांधकाम सभापती सुनील दरेकर तसेच नगरसेविका सौ. आरती पवार उपस्थित होत्या. पाहणीदरम्यान व्यापारी संकुलाच्या सुरू असलेल्या पायाभरणीच्या कामासह अन्य बांधकाम कामांचा आढावा घेण्यात आला.बांधकामाचा दर्जा उत्तम राखण्याबरोबरच कामामध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घेऊन निर्धारित वेळेत काम पूर्ण करावे, अशा सूचना नगराध्यक्ष सौ. बुटाला यांनी संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांना दिल्या.
व्यापारी संकुलाचे काम दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण होण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून आवश्यक त्या बाबींचा नियमित आढावा घेण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
खेड – महाडनाका येथील स्व. तु. बा. कदम व्यापारी संकुलाच्या कामाची नगराध्यक्षांकडून पाहणी!
