दापोली :- भारतीय जनता पार्टी, दापोली यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने भव्य ‘नमो दहीहंडी उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजल्यापासून दापोली येथील नर्सरी,रोड येथे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाच्या गोपाळ संस्कृतीची आठवण जागविण्यासोबतच पारंपरिक उत्साह, आनंद आणि सामाजिक एकोपा जपण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे रचत थरारक प्रात्यक्षिके सादर केली जाणार असून, या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
“या उत्सवाला आपण व आपल्या परिवारासह सहभागी होऊन कृष्णाच्या गोकुळ संस्कृतीचा आनंद लुटावा,” असे आवाहन भाजप दापोलीच्या वतीने करण्यात आले आहे. आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढणार असून, दापोलीकर नागरिकांसाठी हा उत्सव आनंदाचा आणि उत्साहाचा ठरणार आहे.
दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने परिसरात उत्सवी वातावरण निर्माण होणार असून, नागरिक, युवक आणि गोविंदा पथकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळणार आहे. ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून नसरी रोड, दापोली येथे होणाऱ्या ‘नमो दहीहंडी उत्सवा’ला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आयोजकांनी सांगितले आहे.
स्थळ : नर्सरी, रोड, दापोली
दिनांक : ५ सप्टेंबर २०२६
वेळ : दुपारी ३ वाजल्यापासून
आयोजक : भारतीय जनता पार्टी, दापोली.
दापोलीत भाजपच्या वतीने ५ सप्टेंबरला ‘नमो दहीहंडी उत्सव’…
