मंडणगड : तालुक्यातील लाटवण, कादवण, पिंपळगाव गावांचे हद्दीत गुरुवार 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आसमंतात काळे ढग दाटुन आले वादळी वाऱ्यासह सुमारे दहा मिनिटे गारांचा पाऊस पडला. अर्धा तास पावसाच्या तीन सरी पडल्या यामुळे गावातील एका घरावरील कौले उडाली व परिसरात पाणी साठले .पावसाने उन्हाची लाही कमी झाली असली तरी यांचा विपरीत परिणाम आंब्याचे पिकावर होण्याची भिती शेतकर्यांना वाटत आहे .
मंडणगडमध्ये गारांचा पाऊस कसा कोसळला पहा..
