मंडणगड :येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राखी पौर्णिमेचे औचित्य साधून ‘एक राखी – जवानांसाठी’ उपक्रमा अंतर्गत देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी पोस्टामार्फत राख्या पाठवण्यात आल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, डॉ. महेश कुलकर्णी, ग्रंथपाल डॉ.दगडू जगताप, डॉ.संगीता घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या देशाचे संरक्षण करण्यासाठी दिवस-रात्र सीमेवर तैनात असलेल्या जवानांना पाठविण्यात आल्या असून जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण यांनी यावेळी सांगितले. यामध्ये एन.एस.एस. स्वयंसेवकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या हस्ते पोस्ट विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या. महाविद्यालयाने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे पदाधिकारी तसेच मंडणगड परिसरातील ग्रामस्थ व हितचिंतकांनी स्वयंसेवकांचे कौतुक केले आहे.
‘एक राखी – जवानांसाठी’ – मुंडे महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम…
