मंडणगड : मंडणगड तालुक्यातील कुंबळे येथे सार्वजनिक रस्त्यालगत देशी दारूची विक्री केल्याप्रकरणी मंडणगड पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध कारवाई केली.
दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास कुंबळे येथील देशी दारूच्या दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात दि. २७ ऑगस्ट रोजी रात्री ८.२३ वाजता गुन्हा क्रमांक ९८/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ मधील कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, नितीन नरेश मोहिते (वय ३१ वर्षे, रा. तिडे, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार करीत आहेत.