दापोली : कै.कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान, कोळथरेच्या ‘युवा प्रेरणा कट्टा’ टीमच्या माध्यमातून दरवर्षी एक राखी जवानांसाठी हा उपक्रम राबविण्यात येतो.
यावर्षी या उपक्रमाला जोडून शालेय गटात राखी बनवण्याची स्पर्धा आणि उच्च माध्यमिक गटात जवानांसाठी पत्रलेखन/कविता लेखन स्पर्धा घेण्यात आली. या राख्या विशाखापट्टणम येथील नौदलाच्या बेसला पाठवण्यात आल्या.

त्याप्रमाणे आज राखी पोर्णिमेच्या निमित्ताने दापोली पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी आणि दापोली उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
याप्रसंगी दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तोरसकर साहेब , PSI यादव , साखरकर, उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.मोमीन , डॉ.बनसोडे, डॉ.भोजने, डॉ.मोघे , सर्व आरोग्य कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. या उपक्रमाचे नियोजन युवा प्रेरणा कट्ट्याचे श्रीप्रीति वैद्य , गौरी खरे , पायल खानविलकर, गौरी खोत, अवंती केळकर, ऋतिक उगले, प्रमोद पांगारकर,सुमेध करमरकर, नचिकेत बेहरे,मिहीर महाजन , गौरव खरे यांनी केले.