रत्नागिरी : दि.२६/०८/२०२६ रोजी चिपळूण तालुक्यातील सावर्डे अडरेकर मोहल्ला येथे जश्न – ए – ईद-ए-मिलादुन्नबी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद-ए-मिलादुन्नबी म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. हा दिवस 12 रबीउल अव्वल रोजी येतो आणि संपूर्ण मुस्लिम समाजात पवित्र दिवस म्हणून मानला जातो हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.
यावेळी छोट्या छोट्या लहान मुलांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जिवना विषयी नाते पाक, हमद तकरीर करून त्यांनी आपले विचार मांडले यावेळी प्रमुख पाहुणे मौलाना आरीफ घारे, मौलाना रशाद पलनाईक यांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवना विषयी उत्कृष्ट आपले विचार मांडले. या कार्यक्रमांमध्ये ५५ मुलांनी सहभाग घेतला होता.
यावेळी सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.आबासो पाटील, यांच्या प्रमाणपत्र शाल फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले तसेच सावर्डे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष बाबूशेठ चव्हाण, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य पूजा निकम, चिपळूण पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य उज्वला घाग, मनस्वी बैकर, शरद शिगवण, शौकत भाई माखजनकर यांचा ट्रस्ट कमिटीच्या वतीने शाल फुलगुच्छा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम तसेच पंचायत समिती सदस्य यांनी सर्वांना ईद-ए-मिलाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मोहम्मद पैगंबर दिन ईद-ए-मिलाद निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व सर्व लहान मुलांनी सुंदर सुंदर आवाजात आपली कला सादर केल्याबद्दल त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा दिले. यावेळी इयत्ता दहावी मध्ये चांगल्या प्रथम क्रमांक आलेली स्वरा महेश खातू, मिनसा तांबे यांचे ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच सतत डेरवण हॉस्पिटलच्या कामात सर्वांसाठी मदत कार्य करणारे ताहीर भाई गोलंदाज यांचे ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मोहल्ला ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व मोहल्ल्यातील मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी चाहत काद्री यांनी केले व सर्व उपस्थित लोकांचे आभार मांडण्यात आले.
