चिपळूण : शौकत मुकादम: कै.अजित दादा पवार यांच्या स्मरणार्थ दहा हजार फळझाडे व दहा हजार ऑक्सिजन देणाऱ्या झाडांच्या रोपांची ग्रामीण भागामध्ये वाटप व लागवड करण्यात येणार आहे. अशी माहिती चिपळूण तालुका पर्यावरण वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी जाहीर केले आहे. वरील उपक्रमांमध्ये सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे, चिपळूण तालुका पर्यावरण समिती , चिपळूण पंचायत समिती कृषी विभाग,वनविभाग, रोपवन अधिकारी व तालुका कृषी अधिकारी व तालुक्यातील शंभर हून अधिक ग्रामपंचायती सहभाग घेणार आहेत.अशीही माहिती मुकादम यांनी दिली आहे.
व ते पुढे म्हणाले की, पंचवीस विद्यालय व महाविद्यालय या विद्यार्थ्यांना पर्यावरण वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन याविषयी पर्यावरण विषयी माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. वाटप केलेली व लागवड केलेली झाडांची रोपे जगवण्याच्या दृष्टिकोनातून तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.