मंडणगड प्रतिनिधी दि. २९ : मंडणगड शहरातील देशी दारूच्या दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर दारूचे सेवन करून मद्यधुंद अवस्थेत आढळून आलेल्या एका व्यक्तीवर मंडणगड पोलिसांनी कारवाई केली. या संदर्भात
पोलिस स्थानकातुन मिळालेल्या माहितीनुसार, संदीप सखाराम केंद्रे (वय २६, रा. घोसाळे, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) हा २८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे २.१५ वाजता देशी दारूच्या दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर दारूचे सेवन करून मद्यधुंद अवस्थेत आढळून आला.
याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात त्याचे विरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९९/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार सुहास मांडवकर यांनी फिर्याद दिली.या कारवाईत कोणताही मुद्देमाल मिळून आलेला नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.