रायगड : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चौक-कर्जत मार्गावर शासकीय जमिनीवर करण्यात आलेल्या अतिक्रमणा विरोधात अखेर आज प्रशासनाने धडक कारवाई करत बुलडोझर चालवला. मुंबई पुणे राष्ट्रीय मार्गालगत चौक ते कर्जत मार्गांवरील कर्जत फाटा ते वावर्ले पर्यंतचे 26 पेक्षा जास्त बांधकामावर करवाई करण्यात आली.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशाने खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवण्यात आली. ज्या व्यवसायिकाची पक्की बांधकामे आहेत त्यांनी स्वतः बांधकाम काढण्याची विनंती केली त्यामुळे त्यांना 4-5 दिवस दिले आहेत. असे तहसीलदार अभय चव्हाण यांनी सांगितले.

या कारवाईसाठी महसूल प्रशासनासोबत सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, महावितरण आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

कारवाई दरम्यान प्रशासनाने शासकीय जमीन अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कडक पावले उचलली.

यावेळी अतिक्रमण काढलेल्या काही व्यवसायिकानी तहसीलदारांच्या करवाई विरोधात नाराजी व्यक्त केली.

यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना प्रशासनाचा हा थेट इशारा असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.