देवरुख/ प्रतिनिधी : चिपळूणमधील कापडी कुटुंबीयांनी अत्यंत कष्ट, प्रामाणिकपणा आणि उत्तम व्यवस्थापनाच्या जोरावर हॉटेल व केटरिंग व्यवसायात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. खाद्यपदार्थांची उत्कृष्ट चव, ग्राहकांशी आपुलकीचे संबंध आणि दर्जेदार सेवा यामुळे ‘ओमेगा’ हा ब्रँड संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध झाला आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री तथा गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्करशेठ जाधव यांनी काढले.

देवरुख येथील सावरकर चौकात उभारण्यात आलेल्या ‘ओमेगा गार्डन हॉल’च्या उद्घाटनप्रसंगी सोमवारी ते बोलत होते. चिपळूणमधील कापडी कुटुंबीय गेली अनेक वर्षे हॉटेल आणि केटरिंग व्यवसायात कार्यरत आहेत. ‘ओमेगा हॉटेल’, ‘ओमेगा इन’ यांसारख्या हॉटेलच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. श्री. कल्पेश कापडी यांनीही या व्यवसायात अनेक वर्षे काम करताना स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी चार वर्षे माटे- भोजने हॉलचे व्यवस्थापन व केटरिंग सांभाळले होते. आता संतोष उर्फ बंड्या जाधव यांच्या जागेत भाडेतत्त्वावर अत्याधुनिक ‘ओमेगा गार्डन हॉल’ची उभारणी केली आहे.

या उद्घाटन सोहळ्यास चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम, माजी मंत्री तथा माजी आमदार रवींद्र माने, माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. तसेच चिपळूणचे नगरसेवक अजय भालेकर, उमा देसाई, देवरुखचे नगरसेवक बाळा कामेरकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या बोरूरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंद्रथ खताते, शिक्षक नेते बबन बांडागळे, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल, संचालक निहार गुडेकर, खेर्डीचे सरपंच दशरथ दाभोळकर, सतीशअप्पा खेडेकर, बाळू ढवळे, मंगेश माटे, दीपक खेडेकर, राजू वणकुंद्रे, प्रदीप पाटणे, प्रफुल्ल भुवड, पंकज पुसाळकर, नितीन भोसले, पंचायत समिती सदस्य मंगेश बांडागळे, रामू पंदेरे, अनंत जाधव, वैश्य समाज संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष श्रीनाथ खेडेकर, रोहन चौधरी, प्राजेश खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.