चिपळूण: कामगार क्षेत्रात संघटित व असंघटित कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या आणि कामगार क्षेत्रात आपला वचक निर्माण करणाऱ्या श्रमिक उत्कर्ष सभा या कामगार संघटनेच्या सचिवपदी संतोष नलावडे याची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड आणि सरचिटणीस भालचंद्र साळवी यांनी ही निवड जाहीर केली आहे.
चिपळूण येथील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.संतोष नलावडे याची या संघटनेच्या सचिवपदी निवड झाल्याने जिल्ह्यातील कामगारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. कित्येक वर्षे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संतोष नलावडे यांनी कामगार क्षेत्रातील अनेक विषयांना हात घालून न्याय दिला आहे. कामगारांच्या अन्याय विरोधात लढताना त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल झाले आहेत. अनेक वेळा आंदोलन, उपोषण, आशा मार्गाचा अवलंब करून कामगारांना त्यानी न्याय मिळवून दिला.त्यांच्या या कामाची दखल श्रमिक उत्कर्ष सभेच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांनी घेऊन त्याची या पदावर निवड केली आहे
संघटित आणि असंघटित क्षेत्रात श्रमिकने आपल्या नावाचा दबदबा निर्माण आहे. कामगारासाठी प्रामाणिकपणे काम करणारी संघटना अशी ओळख या संघटनेने निर्माण केली आहे. कोकणातसुद्धा ही संघटना काम करीत असून संतोष नलावडे यांच्या माध्यमातून एक कामगार आणि श्रमिक याना महत्वाचा दुवा मिळाला असून संतोष नलावडे यांचे सर्वत्र अभिदन आणि शुभेच्छा देण्यात येत आहेत.