रायगड : सुधागड-पाली तालुक्यात यंदा भव्य दहीहंडी उत्सव २०२६ रंगणार असून, या उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. भारतीय जनता पार्टी सुधागड-पालीच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी पाली येथील बापूजी मंदिरासमोर या भव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुधागड पालीत दहीहंडीचा साहसी, धाडसी आणि संस्कृती जपणारा पारंपारिक दहीहंडीचा थरार अनुभवायास मिळणार आहे.

रायगडसह राज्यातील विविध भागांतून येणाऱ्या गोविंदा पथकांचा थरारक सन्मान आणि दहीहंडी फोडण्याची रंगत या उत्सवात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे स्पर्धेसाठी रोख पारितोषिक म्हणून ३ लाख ३३ हजार ३३३ रुपये, तसेच सुधागड तालुका मर्यादित स्पर्धेसाठी १ लाख ११ हजार १११ रुपयांचे आकर्षक पारितोषिक ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे सुधागड तालुका मर्यादित 1 लाख 11 हजार 111 रुपये व आकर्षक बक्षीसाची गोविंदा पथकांना पर्वणी लाभलीय. तर महिला गोविंदा पथकांना ही आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. अशी माहिती भाजप चे ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ देसाई, गिताताई पालरेचा, तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोंबरे, प्रणाली शेठ, नगराध्यक्ष पराग मेहता, अरिफ मनियार, शरद चोरगे, निलेश खोडागळे, शिरीष सकपाळ आदिसह अन्य पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. गोविंदा पथकांच्या सुरक्षेची ही विशेष खबरदारी घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या भव्य सोहळ्यामुळे पाली शहरात गोविंदा पथकांचा जल्लोष, ढोल-ताशांचा गजर आणि दहीहंडीचा थरार अनुभवायला मिळणार असून, परिसरातील नागरिक आणि गोविंदा प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेय .
“आलेल्या सर्व गोपाळभक्तांचे आणि गोविंदा पथकांचे सस्नेह स्वागत…” असा संदेश आयोजकांकडून देण्यात आला आहे.