ठाणे : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. अनेक ठिकाणी युद्ध आणि युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. अनेक देश आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही आपल्या देशाच्या GDP मध्ये 7.8 टक्क्यांची वाढ होत आहे.
देशाचा GDP वाढला असून, भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. विकसित भारत 2047 हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण एक-एक पाऊल पुढे टाकत आहोत. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून अभिनंदन करतो.
भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. GDPच्या माध्यमातून आपण त्या दिशेने एक-एक पाऊल पुढे जात आहोत. 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा मोदीजींचा संकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारही त्यामध्ये मोठे योगदान देईल, असा मला विश्वास आहे.
विरोधक टीका करत आहेत; मात्र त्यांनी या वाढीचा आनंद झाला पाहिजे. मोदीजींच्या आकसापोटी आणि द्वेषापोटी मोदीजींवर टीका करणे, भारतावर टीका करणे आणि परदेशात जाऊन भारताची बदनामी करणे, हा विरोधकांचा एककलमी कार्यक्रम झाला आहे.
देशाची एवढी मोठी आर्थिक प्रगती होत असताना त्याचे अभिनंदन करण्याऐवजी विरोधक टीका आणि आरोप करत आहेत. मात्र, देशातील 140 कोटी जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल आणि त्यांना सडेतोड उत्तर देईल.