चिपळूण: स्व. नानासाहेब जोशी स्मृती पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पत्रकार मकरंद भागवत यांचा चिपळूण ब्राह्मण सहाय्यक संघातर्फे गौरव करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी ब्राह्मण सहाय्यक संघाचे पदाधिकारी डॉ. जयंत मेहंदळे, अविनाश केतकर, मधुसूदन केतकर आणि आनंद चितळे आदी उपस्थित होते.
दैनिक सागरचे संस्थापक संपादक नानासाहेब जोशी यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार आपल्यासाठी बहुमोल असून आपण दैनिक सागरमध्ये पत्रकारितेला सुरुवात केली आणि आज नानासाहेबांच्या नावाने पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे अत्यंत आनंद होतोय अशी भावना श्री भागवत यांनी व्यक्त केली.
