लांजा : पंचायत समिती शिक्षण विभाग लांजा, लांजा तालुका विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विदयमाने तळवडे येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडेने प्रथम क्रमांक पटकावला. प्रशालेला लांजा तालुक्याचे जिल्हास्तर स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व करता येणार आहे.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ॲस्ट्रिया – द लास्ट होप या नाटिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. यामध्ये तेजस सावंत, श्रेयस चव्हाण, हिमांशू पाटोळे, ज्ञानेश्वरी शिंदे, आराध्या भिंगारे, श्रवण कांबळे, मेघना पोवार यांनी उत्तम अभिनय केला. नाटिकेचे लेखन भूषण बागुल, दिग्दर्शन गणेश झोरे, विवेक किल्लेदार, विनायक घगवे यांनी केले. ध्वनी संयोजन व लाईट संदेश हतपले, योगेश पितळे, नयन पितळे, शुभम भितळे, आकाश भितळे, नयन सांडिम यांनी केले. नाटिका सादर करण्यासाठी मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर, विज्ञान विभाग प्रमुख स्वरा वासुरकर, नेहा पाटोळे, श्वेता सावंत, अक्षता सावंत, योगेश प्रिंदावणेकर, शुभम पाटोळे, अविनाश चव्हाण, जनार्दन पाटोळे, अंश कांबळे यांनी मेहनत घेतली.
नाट्योत्सव स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला लांजा पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, सरपंच रोहिणी आंबेकर, तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबईच्या स्थानिक संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटोळे, कार्यवाह मनोहर पाटोळे, सहकार्यवाह नंदकुमार आंबेकर, स्कूल कमिटी सदस्य विजय पाटोळे, रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाचे माजी कार्यवाह प्रभाकर सनगरे, लांजा तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, विषयतज श्री. पेंडखलकर, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर चव्हाण, स्थानिक संस्थेचे कोषाध्यक्ष सुधाकर पाटोळे, सदस्य महंमद पावसकर, नीलम पाटोळे, स्वाती कदम, शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष अनंत लांजेकर, मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर, परीक्षक अर्चना पेणकर, मनोज रेडीज, सौ. खोत, आदी उपस्थित होते.
प्रशालेच्या यशाबद्दल तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबईचे अध्यक्ष डॉ. आनंद पेडणेकर, उपाध्यक्ष ॲड. रमेश कदम, कार्यवाह मनोहर पाटोळे, स्थानिक संस्थेचे अध्यक्ष दिगंबर पाटोळे, उपाध्यक्ष संजय पाटोळे, कार्यवाह मनोहर पाटोळे, सहकार्यवाह नंदकुमार आंबेकर, शाळा समिती चेअरमन कॅ. नामदेव पाटोळे, सदस्य विजय पाटोळे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनंत लांजेकर तसेच मुंबई संस्था, स्थानिक संस्था, शाळा समिती पदाधिकारी व सदस्य यांनी यशस्वी कलाकार, मार्गदर्शक व पालकांचे अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या.
