गुहागर : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील गुहागरात आले होते. त्यांनी श्री देव व्याडेश्वर व श्री दुर्गादेवीचे दर्शन घेतले आणि नंतर वाहनाने पुन्हा चिपळूण रेल्वे स्टेशनकडे रवाना झाले. त्यांचा हा खाजगी दौरा होता. गुहागरात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चिपळूणमधील करंजेश्वरी मंदिर दर्शन घेऊन वाहनाने गुहागर येथील व्याडेश्वर मंदिरात दाखल झाले. त्यानंतर श्री दुर्गादेवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. मंदिर भेटी आटोपल्यानंतर दुपारी १२.३० वाजता ते वाहनाने पुन्हा चिपळूण रेल्वे स्थानकाकडे रवाना झाले. ना. पाटील हे गेले काही वर्षे आपल्या पत्नीसह गुहागरात येऊन दर्शन घेत असतात. यावेळी दोन्ही देवस्थाच्या वतीने ना. पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी त्यांच्या समवेत सचिन पटवर्धन, माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे, सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, व्याडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शार्दूल भावे, विश्वस्त अमरदीप परचुरे, सचिन मुसळे, शाम आठवले, दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे, नगराध्यक्षा नीता मालप, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, तहसीलदार परीक्षित पाटील, मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, नगरसेवक उमेश भोसले, संतोष सांगळे, सुजित साटले, नगरसेविका सौ. भावे, सौ. सोमण, सचिन ओक, मंदार पालशेतकर, नरेश पवार, संगम मोरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना ना. पाटील यांनी शहरातील समस्यांबाबत चर्चा केली.