आगरवायंगणी : रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी पतसंस्थेचे चेअरमन- दिनेश शिगवण यांच्या अध्यक्षतेखाली सुजित घरत राज्य सरसिटणीस महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना DNE 136 यांच्या प्रमुख उपस्थितीत, कोकण विभागीय उपाध्यक्ष- संतोष हुमणे, जिल्हाध्यक्ष- सुरेंद्र महाडिक, जिल्हा सरचिटणीस- संजय दळवी, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, सर्व जिल्हा कार्यकारणी सदस्य सर्व तालुक्यांचे अध्यक्ष सचिव व मोठ्या संख्येने उपस्थित रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी सभासद यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन 2025/26 या वर्षात नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले ग्रामपंचायत अधिकारी सभासद, पदोन्नती विस्तार अधिकारी व आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत अधिकारी यांचे यशस्वी पाल्यांचा सत्कार समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. बक्षीस वितरण कार्यक्रमांतर राज्य सरचिटणीस श्री. सुजितजी घरत यांनी उपस्थित संघटना व पतसंस्थेचे सभासद यांना संघटना विषयक व पतसंस्थेचे कारभाराविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पतसंस्थेचे कामकाज ग्रामपंचायत अधिकारी वर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल संघटना व पतसंस्था पदाधिकारी यांची अभिनंदन केले. व शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. पतसंस्थेचा स्वनिधी वाढण्यासाठी सर्व सभांसदानी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. त्या सर्व सभासदांनी एकमुखी मान्यता दिली. तसेच ग्रामसभा बाबत घेण्यात आलेल्या निषेध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 1 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या मूक मोर्चास जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांनी उपस्थित राहण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी सभेत केला. सभेचे कामकाज आटोपल्यावर उपस्थित सभासदांचे आभार व्यक्त करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सभेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संचालक मंडळ,जिल्हा कार्यकारिणी, तालुका पदाधिकारी तसेच उपस्थित सर्व ग्रामपंचायत अधिकारी बंधू-भगिनी व चिपळूण तालुका संघटना, पतसंस्थेचे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा राज्य सरचिटणीस सुचित घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न…
