चिपळूण : शंकरवाडी प्रभागातील नागरिकांच्या दीर्घकालीन नागरी समस्या व पुरनियंत्रणाच्या प्रश्नांबाबत नगरसेवक संजय गोताड यांच्या पुढाकाराने आणि नेतृत्वाखाली आज परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. शेखरजी निकम यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

नगरसेवक संजय गोताड यांनी नुकतीच शंकरवाडी परिसरातील नागरिकांची बैठक आयोजित करून भागातील विविध समस्यांबाबत चर्चा केली होती. या बैठकीत नागरिकांनी एकमुखाने दोन महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. त्यानुसार नलावडे बंधारा संरक्षण भिंतीचा उर्वरित दुसरा टप्पा (सुमारे ३०० मीटर) तातडीने पूर्ण करण्यात यावा तसेच शंकरवाडी चौक ते लोटेकर घर या मार्गावर आवश्यक गटार बांधण्यात यावे, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.