चिपळूण : कष्ट, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर चिपळूण तालुक्यातील शिरळ गावच्या मुजफ्फर नासीर शिरळकर या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यासपीठावर आपली ओळख निर्माण केली आहे. मुजफ्फरची ओमानच्या राष्ट्रीय T20 क्रिकेट संघात निवड झाली असून त्याने सिंगापूर विरुद्धच्या सामन्यात T20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

कोकणची माती, ओमानचा अभिमान
मुजफ्फर हा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील शिरळ गावचा रहिवासी आहे. ‘मेहनत • लगन • सब्र • ईमान’ या चार गोष्टींना सोबत घेऊन त्याने आपल्या गावाचं, तालुक्याचं आणि देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केलं आहे.

पुढील लक्ष्य एशियन गेम्स 2026
T20 पदार्पणानंतर आता मुजफ्फरचं पुढील लक्ष्य सप्टेंबर 2026 मध्ये जपान येथे होणाऱ्या एशियन गेम्सवर आहे. ओमानच्या संघाकडून तो देशासाठी शानदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्थानिक क्रिकेटप्रेमी आणि शिरळ गावकऱ्यांनी मुजफ्फरच्या या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे. ‘शिरळचा सुपुत्र, ओमानचा अभिमान!’ अशा घोषणांनी सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे.