रत्नागिरी : शाहनवाज शाह यांची नुकतीच महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग यांच्या निर्देशानुसार यशदा पुणे यांनी कोकण महसूल विभाग मुंबई शहर , मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा या करिता जल योद्धा महणून नियुक्ती केली आहे .
शाहनवाज शाह हे स्थापत्य अभियंता असून पाणी या विषयाचे अभ्यासक आहेत. या पाणी व जंगल या विषयावर गेली २५ वर्षे ते काम करीत आहेत. २०१६ पासून जल साक्षरता अभियानाचे चिपळूण तालुक्याचे ते जल दूत म्हणून काम पाहत होते. शासनाने चला जाणू या नदीला अभियानाची वाशिष्ठी व जगबुडी नदीचे समन्वयक म्हणून त्यांचे वर जबाबदारी दिलेली आहे या वेळी त्यांनी सत्तर एक ग्रामपंचायत मधून जन जागृतीचे काम पहिले. धरणातील गाळ काढणे नाले पऱ्हे मोकळे करून ताब्यात घेणे याकरिता त्यांनी आंदोलन केलेले होते तसेच गेली पाच वर्षे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंडियन रोड कॉंग्रेस च्या मार्गदर्शक तत्वानुसार इंदापूर ते झाराप या प्रभागात वृक्ष लागवड केली जावी या करिता सतत पाठपुरावा व आंदोलन करीत आहेत या वर्षीच्या महाराष्ट्र दिनी त्यांनी याच करिता खड्ड्यात बसून उपोषण केले होते. चिपळूण शहरातील नारायण तलाव हा पूर्णपणे नष्ट झाला होता ग्लोबल चिपळूण व तत्कालीन पालकमंत्री रविद्र वायकर यांचे जवळ पाठपुरावा करून स्वखर्चाने त्याचे डिझाईन करून पुनर्जीवित केला. कोरोना काळात ते सतत कामथे कुटीर रुग्णालयात कोरोना ग्रस्त रूग्णाची सेवा करीत होते या कामा बद्दल अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला. २०२१ च्या महापुरानंतर चिपळूण बचाव समिती सोबत ते सतत होते व तांत्रिक बाजू प्रखरतेने शासनाकडे मांडीत समिती चे वतीने मांडत होते याच वेळी ते नाम फाउंडेशन बरोबर जोडले गेले चिरणी, अस्तान , कांदोशी मिरजोळी व चिपळूण मधील वाशिष्ठी व शिव नदीत काम करण्यात मोठा सहभाग होता. पालक मंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार पावस मजगाव व पोमेंडी या खाडीतील नाम फाउंडेशन च्या माध्यमातून गाळ काढण्यात मोठा सह्भाग होता. रत्नागिरी जिल्हा गाळ निष्कासन समितीवर सदस्य म्हणून सुद्धा काम पाहात आहेत. नदी मध्ये गाळ येऊ नये या करिता “नाम वन संजीवन अभियान” अंतर्गत नाम फाउंडेशनचे वतीने ४३ ग्रामपंचायत मध्ये खड्डे मारून वृक्ष लागवड केली पावणाइ मंदिर (बारा आणे ) निवळी येथे १६० गुंठ्यामध्ये नाम फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात यांचे मार्गदर्शनाखाली १२७ देशी प्रजातीची १६०० वृक्षांची स्थानिक लोकामध्ये जन जागृती करून देवस्थानचे गुलाबराव सुर्वे यांच्या मेहनतीने आज देवराई डौलाने उभी आहे. त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना नदी की पाठशाला फाउंडेशन त्यांना “नदी सेवक” हा किताब दिला. नैसर्गिक जलस्त्रोत्र पुनर्जीवित करणे त्यांचे बळकटीकरण करणे त्यांचे प्रवाह गाळ मुक्त करणे प्लास्टिकन मुक्ती करणे तसेच अनेक वेळा वन वणवा लागलेवर आपल्या सहकार्यांच्या साथीने तसेच नगर पालिका व वन विभागा सोबत आपल्या जीवाची पर्वा न करता प्रति वर्षी अनेक वणवे विजवण्यात यश मिळवले आहे. वन विभाग व अर्थ फाउंडेशान चे वतीने गावागावातून वणवा मुक्ती जन जागृतीचे कार्यक्रम हाती घेतले होते. विना परवाना वृक्ष तोडी विरोधात ते सतत धाडसाने उभे राहत आहेत.
महाराष्ट्र शासनाचे जलसाक्षरता अभियान रत्नागिरी जिल्ह्यात जलसंपदा विभागाला सोबत घेवून पुनश्च उभे केले आहे आज संपूर्ण जिल्ह्यातील जलप्रेमी जलदूत व नदी समन्वयक जोमाने काम करीत आहेत. महाराष्ट्र राज्य शासन जलसंपदा विभाग व यशदा यांनी शाह यांच्या जलक्षेत्रातील कार्याचा अनुभव , प्रत्यक्ष योगदान , पात्रता जल योद्धा निवडी साठी निश्चित केलेलं आवश्यक निकष हे सर्व तपासून जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिनांक २२/०६/२०२६ रोजी कळवून तद्नंतर यशदास्तरीय जलसाक्षरता समिती बैठक डी. १७/०९/२०२६ बैठकी मध्ये सर्व बाबी तपासून सर्वानुमते नाव अंतिम करून दिनांक १७/११/२०२६ रोजी कोकण विभाग जल योद्धा महणून शाहनवाज शाह यांची नियुक्ती जाहीर केली आहे.
शाहनवाज शाह यांची शासनाकडून कोकण विभाग जलयोद्धा पदी नियुक्ती…
