आबलोली : गुहागर तालुक्यातील पेवे खरेकोंड या गावचे सुपुत्र आदर्श किर्तनकार ह. भ. प श्री. सचिन महादेव साळवी यांना प्रतिष्ठेचा समाजभूषण पुरस्कार संत गोरा कुंभार विकास मंडळ चिपळूण व संत गोरा कुंभार नागरी सहकारी पतसंस्था मर्या. खेर्डी यांच्या सयुक्त विद्यमाने देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले.दि.6 संप्टेंबर 2026रोजी संत शिरोमणी गोरोबा काका सभागृह सौरभ चेम्बर्स दुसरा मजला चिपळूण -कराड रोड वरची पेठ खेर्डी ता. चिपळूण येथे प्रतिष्ठित मान्यवर मान.प्रकाशशेठ निवळकर (चिपळूण तालुका कुंभार समाज अध्यक्ष व चैतन्य हाँटेलचे मालक )यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.
ह. भ. प श्री. सचिन साळवी महाराज आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,श्रीगुरू बाबासाहेब आजरेकर फड श्री. क्षेत्र पंढरपूर. आळंदी या फडाचे ते वारकरी असून गेली चौवीस वर्ष किर्तन भजन प्रवचन क्षेत्रात ते सेवा करत आहेत. कोकण तसेच घाटमाथा परिसरामध्ये त्यांनी किर्तन प्रवचन सेवा केली ते म्हणाले सन्मान हा केवळ शाल -पुष्पाचा नसतो तो आपल्या सेवेची मिळालेली प्रेमळ पोचपावती असते.मान . प्रकाशजी निवळकर यांच्या हस्ते माझा झालेला हा सन्मान आमच्या साठी केवळ कौतुकाचा क्षण नाही तर आधिक निष्ठेने आधिक ताकदीने आधिक जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली शेवटी ते म्हणाले हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून ज्यांनी ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये मदत केली त्या सर्वाचा आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून श्री. सतीश दादा दरेकर श्री. रमाकांत क्षीरसागर तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून डॉ.सुरेशजी काळे श्री. पुंडलिक सोनावणे श्री. वसंतराव कुंभार श्री. अण्णा राहुकर श्री. वसंतराव धोडनदीकर श्री. सत्यवान वाळके श्री. अंनत महाडकर श्री. सुरेश बोरस श्री महेश सायकर श्री. भरत शिरसाठ श्री अंनत कुंभार श्री. प्रकाश भालेराव श्री रामदास कुंभार श्री. विलास गुडकर श्री. भानुदास गोर्डेकर श्री. भास्कर कल्याणकर दिपक शिरकर वासुदेव साळवी त्याच प्रमाणे अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
पेवे खरेकोंड गावचे सुपुत्र आदर्श किर्तनकार ह. भ. प श्री. सचिन साळवी समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत..
