चिपळूण : आमदार शेखरजी निकम यांच्या निवासस्थानी आज गणपती बाप्पांची भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी आमदार शेखरजी निकम यांच्यासह सहकुटुंब-सहपरिवार उपस्थित राहून श्री गणरायाची मनोभावे पूजा व सेवा केली.

गणरायाच्या चरणी मतदारसंघातील सर्व जनतेच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली. आपल्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात आनंद, समाधान आणि समृद्धी नांदो, तसेच सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत, अशी मनःपूर्वक भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

गणपती बाप्पांच्या आगमनाने निकम यांच्या निवासस्थानी भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले असून “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.