खेड :- चिपळूण येथील रिक्षाचालक सुनिल काळुसाहेब गुरव वय 45 रा. भिले असुन त्यांनी आपल्या ताब्यातील रिक्षा क्रमांक एमएच 08 A 9789 या वरील चालक खेडला प्रवासी भाडे सोडण्यासाठी आले असता, भोस्ते ते खेड पुलावर रिक्षेला अपघात झाला.

या अपघातात सुनिल काळुसाहेब गुरव वय 45 यांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाली असून, जखमी रिक्षा चालकास कळबणीच्या उपजिल्हा रुग्णालयात जयहिंद रुग्णवाहीकेने उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जखमींवर येथील वैद्यकीय अधिकारी उपचार करीत आहेत. हा अपघात रविवार दि. 20 सष्टेबर 2026 रोजी दुपारी 2.45 वाजताच्या सुमारास घडला. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.