चिपळूण : भारतीय राज्यघटनेत 51Ah कलमानुसार जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य सांगितले आहे. संविधानातील हे तत्व आपल्याला घराघरांमध्ये घेऊन जायचं आहे प्रत्येक युवकाच्या मनात विवेकाचा दीप प्रज्वलित करायचा आहे यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची नितांत गरज आहे

आपल्या जीवनात निर्माण होणारे विविध प्रश्न वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे सोडवायचे ? मानसिक आजारापासून कसं दूर राहायचं? हे समजून घेण्यासाठी एका विशेष सभेचे आयोजन रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाचा जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण करायची आहे.

ज्यांना सामाजिक कार्यात रस आहे असा युवक युवती व नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चिपळूण विभागातर्फे करण्यात येत आहे.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक प्राचार्य हरिभाऊ पाथोडे यांच्या विशेष मार्गदर्शन लाभणार आहे

स्थानिक कार्यकर्ते एडवोकेट योगेश पवार संघटक रत्नागिरी, विलास डिके, संगमेश्वर संघटक मिलिंद कडवेकर तसेच जेष्ठ कार्यकर्ते अजित पाद्ये, नीता दुबे ,कल्पना गोसावी ,दामोदर लेले व रवी खानविलकर हे देखील उपस्थित राहणार आहेत.

बैठकीचा वेळ :- दुपारी 3.30 वा

बैठकीचे स्थळ:-
संदीप पवार यांचे घर
मुक्काम:- खांडोत्री
पोस्ट :- आबिटगाव
तालुका :- चिपळूण

सावर्डे-वहाळ फाटावरून 10 किलोमीटरवर माध्यमिक शाळेजवळ पवार सरांचे घर आहे.
फोन. 9967834831