गुहागर : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा गुहागरमध्ये शुभारंभ करण्यात आला. यावेळी महावितरणचे अधिकारी, अभियंते तसेच विद्युत ग्राहक संघटनेचे पदाधिकारी आणि सोलार क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.

या शुभारंभप्रसंगी गुहागरचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील चव्हाण, उपकार्यकारी अभियंता सुनील सुद, तळवलीचे कनिष्ठ अभियंता ऑल्विन फर्नांडिस, गुहागरचे सहाय्यक अभियंता ऋषिकेश शेटये, शृंगारतळीचे सहाय्यक अभियंता बापू सोनावणे, गुहागरच्या सहाय्यक अभियंता काजल नायक, गुहागर आगार प्रमुख स्वप्नील शिंदे उपस्थित होते.

तसेच गुहागर तालुका विद्युत ग्राहक संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे, इंडोवॅट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, सावर्डे (सोलार)चे मंदार शेंबेकर, अबलोलीचे कनिष्ठ अभियंता सुजय निकम आणि गुहागरचे उच्चस्तरीय लिपिक महेश डिंगणकर यांचीही उपस्थिती होती.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या गुहागरमधील शुभारंभप्रसंगी संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.