खेड :- येथील रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या मान्यतेने डेरवण येथील SVJCT क्रीडा संकुल येथे रविवार दि. 27 सष्टेबर 2026 रोजी पार पडलेल्या विभागीय शालेय 14 वर्षाखालील व 19 वर्षाखालील वयोगटातील टेबल टेनिस स्पर्धेत 7 जिल्ह्यातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवत 14 वर्षाखालील वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये श्रेयसी गायकवाड, प्रणाली नारळे, आनंदी नागरगोजे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. आणि 19 वर्षाखालील वयोगटातील हुमेरा खान, प्रियदर्शनी राव, वेदा वालपकर, सिया हेदुकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
वरील खेळाडूंनी प्राप्त केलेल्या या यशामुळे सर्वच स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्व खेळाडूंना टेबल टेनिस मार्गदर्शक श्री.ऋषिकेश राठोड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन श्री. डॉ. उपेंद्र तलाठी , सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.