खेड :- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील व तालुक्यातील सात्विनगांव येथील दाभिळ नाका येथील 21 वर्षीय विवाहित महिला सौ. सिंधुरा सचिन कनकुटे या घरात कोणालाही न सांगताच निघुन गेल्यावर, त्या अद्यापही घरी आल्याच नाहीत, याबाबत अज्ञात इसमाने या विवाहित महिलेचे अपहरण केल्याप्रकरणी पती सचिन भगवान कनकुटे वय 28, रा सात्विनगांव, दाभिळनाका, ता खेड जि रत्नागिरी यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, ही घटना दि. 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 09.00 ते संध्याकाळी 06.15 वाजण्याच्या मुदतीत घडली असून, या अपहरण गुन्ह्याची येथील अज्ञात इसमाविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 327/2026 मध्ये भारतीय न्याय संहिता 2023 चे अधिनियम कलम 140(3), भादवि 365 नुसार येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या अपहरण गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.