चिपळूण : मा. खासदार नारायणरावजी राणे साहेब यांच्याकडे खेर्डी औद्योगिक वसाहत येथे अग्निशमन केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपा तालुकाध्यक्ष तसेच पंचायत समिती सदस्य श्री. विनोद जयवंत भुरण यांनी केली.
खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे असून, परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता आपत्कालीन परिस्थितीत तातडीने अग्निशमन सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे. आग लागण्यासारख्या दुर्घटनांच्या वेळी नागरिक व उद्योगांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे अग्निशमन केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
याबाबत मा. खासदार नारायणरावजी राणे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
खेर्डी औद्योगिक वसाहतीसाठी अग्निशमन केंद्राची मागणी
