रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, वीर नारी, वीर माता आणि वीर पिता यांच्या विविध प्रशासकीय व वैयक्तिक अडीअडचणी सोडवण्यासाठी माहे ऑक्टोबर २०२६ मध्ये खेड आणि चिपळूण येथे कल्याण संघटकांच्या विशेष दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.
या दौऱ्यांदरम्यान माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना भेडसावणारे अभिलेख कार्यालय विषयक (Record Office) प्रश्न, पेन्शनच्या अडचणी, महासैनिक पोर्टलवर नवीन नोंदणी (Registration) करणे तसेच इतर सर्व प्रकारच्या प्रशासकीय अडचणींचे जागेवरच निराकरण करण्यात येणार आहे.
दौऱ्यांचे सविस्तर वेळापत्रक:

  • ५ ऑक्टोबर (सोमवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड (कल्याण संघटक: सुनिल कदम)
  • १२ ऑक्टोबर (सोमवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड (कल्याण संघटक: राहुल काटे)
  • १३ ऑक्टोबर (मंगळवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण (कल्याण संघटक: राहुल काटे)
  • १९ ऑक्टोबर (सोमवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड (कल्याण संघटक: सुनिल कदम)
  • २१ ऑक्टोबर (बुधवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण (कल्याण संघटक: सुनिल कदम)
  • २६ ऑक्टोबर (सोमवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड (कल्याण संघटक: राहुल काटे)
  • २७ ऑक्टोबर (मंगळवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण (कल्याण संघटक: राहुल काटे)
    आवश्यक कागदपत्रे:
    शिबिराचा लाभ घेण्यासाठी येताना माजी सैनिक व त्यांच्या वारसांनी मूळ कागदपत्रांसह (Original) त्यांच्या प्रत्येकी दोन छायांकित प्रती (Xerox) सोबत आणणे आवश्यक आहे:
  • महासैनिक पोर्टलवर (www.mahsainik.maharashtra.gov.in) नोंदणी केलेली पावती
  • डिस्चार्ज बुक (Discharge Book)
  • पी.पी.ओ. (PPO) ची प्रत
  • पॅन कार्ड
  • बँकेचे पासबुक
  • ई.सी.एच.एस. (ECHS) कार्ड
  • आधार कार्ड व आधारशी जोडलेला चालू मोबाईल क्रमांक
    जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीर नारी व त्यांच्या कुटुंबीयांनी आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी ठरवून दिलेल्या दिवशी उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.