खेड : कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित, लांजा यांच्या खेड शाखेचा पहिला वर्धापन दिन सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता खेड शाखा कार्यालय येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.

या वर्धापन दिन सोहळ्यास तु.बा.कदम सिनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री.विजयकुमार चोपडे सर सहकार क्षेत्रावर मार्गदर्शन करण्यास उपस्थिती म्हणून लाभणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत परवडी, उपाध्यक्ष श्री. विलास दरडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संदीप डाफळे तसेच खेड शाखेचे प्र.शाखाधिकारी श्री.रूपेश गोठणकर यांच्यासह संचालक मंडळ, स्थानिक कमिटी सदस्य, कर्मचारी, पिग्मी व रिकरिंग प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

खेड शाखेच्या स्थापनेपासून गेल्या एका वर्षांच्या कालावधीत सभासद, ठेवीदार आणि हितचिंतकांच्या विश्वासाच्या बळावर शाखेने आर्थिक सेवा विस्तारण्याचा प्रयत्न केला आहे. विविध बचत व ठेव योजना, कर्ज सुविधा तसेच संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या अन्य आर्थिक सेवांचा लाभ सभासदांना मिळवून देण्यासाठी शाखेने कार्य केले आहे.

प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने शाखेच्या गेल्या एका वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेण्यात येणार असून, भविष्यातील कार्याचा संकल्पही यावेळी करण्यात येणार आहे. सभासद, ठेवीदार व हितचिंतकांशी संस्थेचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा वर्धापन दिन सोहळा महत्त्वाचा ठरणार आहे.

या कार्यक्रमास खेड शाखेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वर्धापन दिन सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन कुणबी विकास सहकारी पतसंस्थेच्या खेड शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.