लांजा:(गोविंद चव्हाण) : लांजा शहरामध्ये कचऱ्याचे योग्य प्रकारे योग्य वेळेत व्यवस्थापन व लांजा शहर स्वच्छ- सुंदर व्हावे यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करावा अशी मागणी राष्ट्र सेविका समिती दक्षिण रत्नागिरी पर्यावरण गतीविधी शारदा लांजा शाखेच्यावतीने बुधवारी निवेदनाद्वारे लांजा नगरपंचायतीकडे करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला लांजा शहरातील प्रतिष्ठित नागरिक, तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, व्यापारी संघ, शिक्षक, विद्यार्थी यांना सहभाग घेता येणार आहे. राष्ट्र सेविका समितीच्या दक्षिण रत्नागिरी पर्यावरण गतीविधी प्रमुख सौ. तीर्था कुलकर्णी यांनी पत्रकारांना माहिती देताना लांजा शहरातील कचरा व त्याचे योग्य व्यवस्थापन व शहरातील परिसर स्वच्छता राखणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे असल्याची माहिती दिली. यासह सौ. तीर्था कुलकर्णी यांनी लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. सावली कुरुप यांची भेट घेऊन या कार्यक्रमाबाबत चर्चा करुन नगरपंचायतीला निवेदन दिले.