खेड : – येथील नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ६ मधील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला.
येथील नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ६ मधील योगायोग सोसायटी येथील मोरे घर ते शेठ यांच्या घरापर्यंत गटाराचे बांधकाम करणे, संत सेनानगर येथील अंतर्गत गटाराचे बांधकाम करणे, खेड नगरपरिषद हद्दीत शिवतर रोड येथील संतोष पवार यांचे घरापासून उदय जोशी घरापर्यंत गटार बांधणे आदि विकासात्मक कामाला महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री, शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत तसेच महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांच्या सहकार्याने बुधवार दि. ६ मे २०२६ रोजी प्रभाग क्रमांक ६ मधील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ. माधवीताई राजेश बुटाला, शहरप्रमुख कुंदन सातपुते, उपनगराध्यक्ष श्री. सतीश चिकणे, बांधकाम सभापती श्री. सुनील दरेकर, शिवसेना गटनेते श्री. निकेतन पाटणे, स्वच्छता सभापती तौसिफ खोत, समाजकल्याण सभापती सभापती यश खेडेकर, नगरसेविका सौ. वैभवी वैभव खेडेकर. नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर, अंकुश विचारे तसेच खेड नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका यांच्यासह प्रभाग क्रमांक ६ मधील ग्रामस्थ खेडेकर. दिवटे, मोरे, तटकरी, शेठ, जोशी, कवळे, इनामदार, सावंत, गांगण, पवार, गांधी, म्हस्के, घोडे, काते, उपावले, आदि प्रमुख नागरिकांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहोळा पार पडला. प्रभाग क्रमांक 6 मध्ये विकासात्मक कामांच्या भूमिपूजन सोहोळ्याचे नागरीकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असुन समाधान व्यक्त होत आहे.
खेड शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील विकासकामांचा भूमिपूजन सोहोळा !
