चिपळूण : भारतीय जनता पार्टी चिपळूण ग्रामीण मंडळाच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ४ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी शिक्षक पतसंस्था सभागृह, चिपळूण येथे महा-रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी रक्तकेंद्र, B.K.L. वालावलकर हॉस्पिटल श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटर, सावर्डे तसेच डेरवण रक्तपेढी यांच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले. या शिबिरात तब्बल ९७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक सेवेत आपला सहभाग नोंदविला.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास प्रोत्साहन म्हणून बाईक हेल्मेट भेट देण्यात आले. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना मदत मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
या वेळी भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, चिपळूण भाजपा तालुकाध्यक्ष विनोद भुरण, खेर्डी गण जि.प. सदस्य रावी मोरे, पेढे गण जि.प. सदस्य दीप्ती महाडिक, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सचिव प्रणाली सावर्डेकर, रत्नागिरी दक्षिण सरचिटणीस स्वानंद रानडे, सुप्रिया उतेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, चिपळूण भाजपा तालुका प्रभारी रामदास राणे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष आदिती गुढेकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर भुरण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ऋषिकेश कदम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच चिपळूण भाजपा ग्रामीण मंडल उपाध्यक्ष संदीप सुखदरे, महेश शिंदे, सरचिटणीस दीपक शिंदे, महिला मोर्चा चिटणीस विया नलावडे, युवा मोर्चा उपाध्यक्ष योगेश मोहिते, सेवा व आपले योगदान कार्यक्रम सहसंयोजक राकेश खरात, संकेत चिले, विनय दाते, सुदेश जाधव आणि खेर्डीच्या माजी सरपंच वृंदा दाते यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रक्तदाते उपस्थित होते.
या महा-रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ‘सेवा हीच संघटनेची ओळख’ हा संदेश देत भाजप चिपळूण ग्रामीण मंडलाने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.
भाजप चिपळूण ग्रामीण मंडळाच्या महा-रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…
