खेड :- शहरातील महाड नका व डाक बंगला परिसरातील मुस्लिम समाजातील युवकांनी उभाठा गटातून शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते रामदास भाई कदम व गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत प्रवेश केला. प्रवेश करणा-या युवकांचे जंगी स्वागत करण्यात आले. या युवकांनी शिवसेनेत प्रवेश करून संघटनेला बळकटी देण्याचा निर्धार केला. महाराष्ट्र चे माजी पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते रामदासभाई कदम, व गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी एकजुटीने शिवसेनेचे काम करण्याचा संकल्प केला.
या वेळी ज्येष्ठ हश्मतभाई पारकर, माजभाई हमदुळे, अराफत सुर्वे, मन्सूरभाई मुकादम, जैनुद्दीनभाई पारकर, मौजमभाई परकार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाड नाका व डाकबंगला परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद निश्चितच वाढली आहे. नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या सर्व युवकांचे मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
योगेशदादांच्या नेतृत्वावर विश्वास, शिवसेनेच्या विचारांशी निष्ठा आणि विकासाच्या वाटचालीसाठी एकजूट झाली आहे.