मुंबई : ऋणानुबंध ट्रस्टचे विश्वस्त, ज्येष्ठ रुग्णसेवक व समाजसेवक वसंतभाई गलिया यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त ऋणानुबंध ट्रस्ट परिवारातर्फे नागरिकांसाठी विशेष सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रुग्णसेवा आणि समाजसेवेच्या कार्याशी जोडलेल्या शेकडो रुग्णमित्रांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांना आरोग्य सेवा, विविध शासकीय योजना तसेच रुग्णालयीन प्रक्रियांबाबत महत्त्वाची माहिती व मार्गदर्शन देण्यात आले.
​विलेपार्ले (पू.), रामकृष्ण हॉटेलच्या मागील सभागृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, कागदपत्रे तसेच रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला सिद्धिविनायक ट्रस्टचे विश्वस्त आचार्य पवन त्रिपाठी, महापालिकेच्या विविध रुग्णालयांशी संबंधित प्रतिनिधी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. माजी अधिष्ठाता पिनाकीन गुज्जर तसेच नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, रोटरीक्लबचे केतन मेहता, रुग्ण मित्र धनंजय पवार,गणेश पवार. रुग्ण सेवक जितेंद्र जनावळे चंद्रकांत पवार यांनीही उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.
​यावेळी उपस्थित मान्यवरांनी वसंतभाई गलिया हे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह गरजू नागरिकांना करत असलेल्या मदतीच्या कार्याचे कौतुक केले. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयीन प्रक्रिया, शासकीय योजना तसेच उपलब्ध आरोग्य सुविधांची योग्य माहिती मिळवून देणे ही अत्यंत महत्त्वाची सामाजिक सेवा असल्याचे मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमासाठी आयोजन सक्रिय कार्यकर्ते विजय बाईत शँकर जाधव सुशांत,कोकण कट्टाचे अजितदादा पितळे, मनिष माईन,सुजीत कदम दया मांडवकर निशिकांत मोरे प्रभाकर खेडेकर आत्माराम डिके तसंच अनेक पार्लेकर संस्थांचे सदस्य उपस्थित होतें जनदिनाचे औचित्य साधून वसंतजीनी रुग्णसेवेसाठी तत्पर असणाऱ्या सेवाकार्यकर्त्यांना या अमूल्य मार्गदर्शनाने सेवेचा व रुग्ण सेवेचा महामार्ग दाखवला आहे असहा आगळा वेगळा वाढदिवस सोहळा यशस्वी संपन्न झाला.