मुंबई :- अभिनेते नाना पाटेकर यांचे मराठी नाटकासह मराठी, हिंदी सिनेमातील अतुलनीय योगदान पहाता त्यांचे अंत्यसंस्कार “शासकीय इतमामात” करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतला आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी दिली.
अभिनेते नाना पाटेकर यांचे आज गुरुवारी पहाटे गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
