चिपळूण :जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून निहार गुढेकर यांची निवड झाल्यानंतर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रणव शामराज यांनी गुढेकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मागील आठवड्यात जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनची चुरशीची निवडणूक झाली. गेल्या 25 वर्षांच्या कालावधीत ही निवडणूक प्रथमच झाली. यापूर्वी जिल्ह्याची कार्यकारिणी असोसिएशनचे सर्व ज्येष्ठ सदस्य व पदाधिकारी एकत्र येऊन निवड करीत होते. मात्र, यावेळी निर्भय पॅनेल व एकता पॅनेल अशी चुरशीची लढत झाली. नव्याने स्थापन झालेल्या निर्भय पॅनेलने प्रस्थापितांच्या एकता पॅनेलवर निवडणुकीत एकतर्फी विजय मिळविला. यावेळी निर्भयचे सर्वच्या नऊ सदस्यांमध्ये विजयी झालेले निहार गुढेकर यांचे डॉ. प्रणव शामराज यांनी अभिनंदन केले. यावेळी अजित पवार राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, सागर पालकर, सचिन जंगम, मयूकर कोळवणकर, धीरज पालकर, अवधूत कोळवणकर, सिद्धेश जागुष्टे, दादू गुढेकर उपस्थित होते.