चिपळूण – विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी चिपळूण भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत मोदी सहभागी झाले आहेत.
महाबळेश्वर येथील गिरिस्थान प्रशाला येथे भाजप गटनेते शशिकांत मोदी आणि दिनेश लटके यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी महायुतीच्या पदवीधर उमेदवार स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा प्रचार करण्यात आला. मतदारांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.
या प्रचारात स्थानिक भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाबळेश्वर चे नगराध्यक्ष श्री. सुनील शिंदे यांच्या येथे विधानपरिषद प्रचारासाठी त्यांनी बैठक घेतली.
