जळगाव : तिरंगा फडकवणार म्हणून कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके आणि आयसाच्या नेहा बोरा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. आता या देशात तिरंगा फडकवणे पण गुन्हा झाला आहे का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावरून याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. त्यात त्या म्हणाल्या की, आधी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना अटक केली गेली. आता अभिजीत दिपके आणि नेहा बोरा यांना ताब्यात घेण्यात आले. कारण काय तर त्यांनी आपल्या देशात तिरंगा फडकवला. आता या देशात तिरंगा फडकवणे पण गुन्हा झाला आहे का ? ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ म्हणून स्वतःचा पीआर करणाऱ्यांना आता तिरंग्याचा इतका तिरस्कार का वाटत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.