खेड : शहरातील संत रोहिदास नगर येथे सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री श्री. योगेशदादा रामदासभाई कदम यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी देवीचे मनोभावे दर्शन घेत पूजा-अर्चा केली. त्यांच्या भेटीमुळे संत रोहिदास नगरमधील समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
याप्रसंगी खेड नगराध्यक्षा सौ.माधवीताई बुटाला, श्री. शहरप्रमुख कुंदन सातपुते, युवासेना जिल्हाप्रमुख दर्शन महाजन, नगरसेवक श्री. सुनील दरेकर, यश खेडेकर, श्री. प्रेमल चिखले आणि श्री.भूषण चिखले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संत रोहिदास समाज सेवा संघाच्या वतीने गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांचा सन्मान करण्यात आला. समाजाचे अध्यक्ष सुधीर देवळेकर, उपाध्यक्ष गोविंद खेडेकर, कार्याध्यक्ष बाळकृष्ण खेडेकर, सचिव उमेश खेडेकर, सुभाष खेडेकर, सल्लागार हिरामण खेडेकर, विलास देवळेकर, प्रथमेश गिम्हवणेकर, राकेश खेडेकर, अनिकेत खेडेकर, संदेश खेडेकर, अतुल खेडेकर, रमेश खेडेकर, दीपक देवळेकर, अनिल देवळेकर, गणेश खेडेकर आणि सुदेश खेडेकर, चंद्रकांत खेडेकर, रतन खेडेकर यांनी या सन्मान सोहळ्यात सहभाग घेतला.
तसेच माजी नगरसेविका रुपाली खेडेकर, सीमा खेडेकर, आशालता खेडेकर, सौ. वंदना खेडेकर आणि सौ. खेडेकर यांच्यासह समाजातील महिला व समाजबांधव उपस्थित होते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या भेटीत देवीचे दर्शन, पूजा-अर्चा आणि मान्यवरांचा सन्मान अशा कार्यक्रमांमुळे उत्सवाला विशेष रंगत आली.