मंडणगड : आगामी काळात मंडणगड तालुक्यात उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नामदार योगेशद कदम यांच्या अध्यक्षतेखाली21ऑक्टोबर 2026 रोजी पंचायत समिती मंडणगड येथे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीस रत्नागिरी जि.प.अध्यक्षा अस्मिता केंद्रे सभापती प्रणाली चिले जि.प.सदस्य प्रताप घोसाळकर उपसभापती दीपक मालुसरे पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे सौ दिप्ती घडशी तहसिलदार अक्षय ढाकणे गटविकास अधिकारी राजेंद्र आमधळे व तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मंडणगड तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेऊन नागरिकांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता पुरेशा प्रमाणात व्हावी, यासाठी आवश्यक नियोजन करण्यावर भर देण्यात आला. उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर होऊ नये, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आतापासूनच योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
तालुक्यातील गावनिहाय संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करणे, आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आणि उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता असलेल्या भागांमध्ये वेळेत उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. नागरिकांना पाणीटंचाईचा त्रास होऊ नये, यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती पूर्वतयारी करून पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, हा या बैठकीमागील महत्त्वाचा उद्देश होता. या बैठकीमुळे मंडणगड तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न हाताळण्यासाठी प्रशासनाला आवश्यक नियोजन आणि उपाययोजनांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने दिशा मिळण्यास मदत होणार आहे.
नामदार योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंडणगड तालुक्यातील पाणीटंचाईच्या उपाययोजनांबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक…
