खोपोली -मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज सोमवार सकाळी एका कंटेनरने समोरील टेम्पोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातानंतर दोन्ही वाहने 50 फूट दरीत कोसळल्याने कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर टेम्पो चालक जण जखमी झाला आहे
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुंबई कडे कंटेनर क्रमांक( MH 43 Y 3570) हा चालक मोहमद कैफ( 24 रा आंबेडकरनगर उत्तरप्रदेश) हा पुण्याहून मुंबई कडे आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन जातं असताना बोरघाटात ढेकू गावच्या हद्दीत आला असता चालकाचे कंटेनर वरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील टाटा टेम्पो क्रमांक (MH 04 LQ 4313 ला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल दरीत कंटेनर आणि टेम्पो कोसळला या अपघातात कंटेनरच्या केबिन मध्ये चालक अडकून त्याचा जागीच मृत्यू झाला तर टेम्पो चालक मीराज शेख (वय 29 ) हा जखमी झाला आहे
या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, आयआरबी यंत्रणा, हेल्प फाउंडेशनचे सदस्य, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, लोकमान्य हॉस्पिटलची ऍम्ब्युलन्स एफकोन कंपनीची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्त वाहना मध्ये अडकलेल्या जखमी चालकाला बाहेर काढून पुढील उपचारासाठी खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे