मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यांतील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या आरवली-माखजन-करजुवे-डिंगणी-संगमेश्वर (प्रजिमा-४३) रस्त्यावरील करजुवे-तिसंग ते भातगाव दरम्यानच्या मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.
या पुलासाठी फेब्रुवारी २०२२ मध्ये २३ कोटींना प्रशासकीय मान्यता मिळाली होती, परंतु एकूण ६० कोटींच्या प्रकल्पासाठी उर्वरित ३६ कोटींची आवश्यकता आहे. यासाठी आमदार शेखर निकम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन हिवाळी अधिवेशन २०२६-२७ मध्ये निधीची तरतूद करण्याची मागणी केली.
या मागणीवर मंत्र्यांनी “अपर मुख्य सचिव, सा. बां. विभाग यांनी उचित कार्यवाही करावी” असा महत्त्वपूर्ण शेरा दिला आहे.
या पुलामुळे:
- संगमेश्वर-गुहागर अंतर ३० किमीने कमी होणार
- शिक्षण, आरोग्य, आंबा-काजू-मासे वाहतूक सुलभ होणार
- गणपतीपुळे-गुहागर पर्यटनाला चालना मिळणार
